|| शुभ मंगल सावधान ||

लग्न.प्रत्येक मुला मुलीचा आयुष्यातील अतिशय महत्वाचा क्षण.
सगळ्या मुला मुलींची काही स्वप्न असतात आपल्या जोडीदाराविषयी. आणि मग त्याला अनुसरून वधू आणि वर संशोधन चालू होत.
काही जन Love Marriage करतात तर काहीजण Arrange Marriage. आज काल तर Live in Relationship चा नवा फंडा चालू झाला आहे .
आणि हा प्रकार आता सर्वमान्य होईल का काय अस वाटतंय . याच कारण म्हणजे हल्लीच एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात १ जाहिरात वाचली.
त्यात स्पष्ट लिहिलेला कि Live in Relationship साठी उत्सुक असणार्यांनीच फोन करावा.
   आज काल मुला मुली दोखांचा कल Career घडवण्याकडे आहे . त्यामुळे लग्नाची वय वाढत चालली आहेत. त्यात भर म्हणजे मुला मुलींचा भावी जोडीदाराविशयी च्या अपेक्षा अवाजवी बनत चालल्या आहेत .  सगळ्या गोष्टी पैशात मोजायचा आणि ती व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे याकडे बर्याच प्रमाणात दुर्लक्ष होत आहे . या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे घटस्पोट होण्याचे प्रमाण वाढले आहे . अगदी भातुकलीचा खेळ अर्धवट मोडावा तसे लोक घटस्पोट घेत आहेत .
               पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती त्यामुळे एक मेकांना सांभाळून घेतल जायच. पण आज मुलींना आई वडिलांपासून वेगळ राहणारा मुलगा हवा असतो . मुलानाही मुलगी म्हणजे कोणीतरी Dream Girl असावी अशी अपेक्षा असते . परंतु हीच व्यक्ती आपल्याला आयुष्यभर सोबत देईल का हा विचार बरेच जन करत नाहीत अस वाटत .
              मुला मुलींचे आई वडील हि अवाजवी अपेक्षा धरून असतात. आणि Compromise करायला कोणीही तयार नसत . त्यामुळे मुलांनी मुलींना  आणि
मुलींनी मुलांना नकार देण्याचे प्रमाण वाढले आहे . त्यातच लहान पणापासून काहींना नकार ऐकण्याची सवय नसल्यामुळे काही प्रमाणात गुन्हेही घडत आहेत .

पुढचा लेखात पाहूयात नकार देण्याची काही महत्वाची कारणे....